दहशतवाद्यांशी एकटा भिडला, बंदूक हिसकावली

दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा पर्यटकांना वाचवण्यासाठी स्थानिक मुस्लिम नागरिक सय्यद आदिल हुसैन शाह एकटा भिडला. पहलगामच्या बेस कॅम्पवरून पर्यटकांना खेचरावरून बैसरन पर्वत रांगांमधील पॉइंट दाखवण्याचे काम तो करत होता. जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा तो एकटा भिडला; परंतु त्याला प्राण गमवावे लागला. तो त्याच्या घरातील एकमेव कमावता व्यक्ती होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना त्याच्या अशाप्रकारे जाण्याने मोठा धक्का बसला. दरम्यान, सय्यद आदिल हुसैन शाह याच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जम्मू आणि कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि इतर मंत्री तसेच अधिकारी उपस्थित होते.