
पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका रुग्णालयावर एअरस्ट्राईक केला आहे. या भयंकर हल्ल्यात 400 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तालिबान प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे. या हल्ल्यानंतर सर्वत्र हाहाकार माजला आहे.
पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका रुग्णालयावर एअरस्ट्राईक केला आहे. या भयंकर हल्ल्यात 400 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद नबीने या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे. pic.twitter.com/PWrntWMyPi
— Saamana Online (@SaamanaOnline) March 17, 2026
तालिबानचे प्रवक्ते हम्दुल्ला फित्रत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 9 च्या सुमारास पाकिस्तानी हवाई दलाने काबूलमधील ‘ओमीद नशामुक्ती रुग्णालया’वर (Omid Addiction Treatment Hospital) बॉम्ब टाकले. हे रुग्णालय खूप मोठे असून इथे एका वेळी दोन हजाराहून अधिक रुग्ण उपचार घेत असतात. या हल्ल्यात रुग्णालयाचा एक मोठा भाग उद्ध्वस्त झाला आहे. ढिगाऱ्याखाली अनेकजण गाडले गेले आहेत. अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने मृतांची संख्या ४०० पर्यंत पोहचल्याचे सांगितले आहे.
पाकिस्तान सरकारने रुग्णालयावर हल्ला केल्याचा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला आहे. पाकिस्तानच्या माहिती मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, “पाकिस्तानी हवाई दलाने काबूल आणि नंगरहार प्रांतातील केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य केले आहे. अफगाणिस्तानातील दहशतवादी या तळांचा वापर करून पाकिस्तानमध्ये हल्ले करत होते.” तालिबानचा रुग्णालयावरील हल्ल्याचा दावा हा ‘खोटा आणि दिशाभूल करणारा’ असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.































































