
अमेरिका के पापा ने वॉर रुकवा दिया… ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर बिथरलेला पाकिस्तान गेले चार दिवस हिंदुस्थानवर हल्ले करत सुटला. हे हल्ले हाणून पाडत हिंदुस्थानने पाकिस्तानची नांगी ठेचली. या तणावात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज मध्यस्थी केली. मग गुडघ्यावर येत पाकिस्तानने शस्त्रसंधीची विनंती केली. त्यानुसार सायंकाळी पाच वाजता दोन्ही देशांनी घोषणाही केली. मात्र अवघ्या तीनच तासांत पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली. जम्मू, श्रीनगर, कठुआत गोळीबार, राजौरीत तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. तर उधमपूरवर ड्रोनहल्ला झाला. त्यावर रात्री 11 वाजता तातडीची पत्रकार परिषद घेत परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला दरडावले. ‘आता जे होईल त्याला तुम्हीच जबाबदार असाल’, असे ठणकावत केंद्राने लष्कराला कारवाईसाठी ‘फ्री हँड’ दिला.
सायंकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही बाजूंनी शस्त्रसंधी लागू करण्यात आली असून सीमेवर दोन्ही बाजूंनी केली जाणारे हल्ले आता थांबले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांनी शस्त्रसंधी करावी असा सल्ला देत मध्यस्थी केली. याबाबत आता 12 मे रोजी दुपारी 12 वाजता पाकिस्तानचे डीजीएमओ अर्थात लष्करी कारवायांसंदर्भातील महासंचालक पुढील चर्चा करणार आहेत. युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजता संरक्षण मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्यासोबत कोमोडर रवी नायरदेखील उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्थानी लष्कराची भूमिका स्पष्ट केली. आज झालेल्या शस्त्रसंधीचे आम्ही पालन करू, परंतु पाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा आगळीक झाल्यास आम्ही सडेतोड उत्तर देऊ. कायम सतर्क असू, हिंदुस्थानचे सार्वभौमत्व आणि अखंडता कायम राखण्यासाठी आम्ही बांधील आहोत, असा इशारा कमोडोर रवी नायर यांनी दिला. पाकिस्तानच्या कोणत्याही आततायी कारवाईवर हिंदुस्थानने पूर्ण ताकदीने उत्तर दिले, असे ते म्हणाले.
हिंदुस्थान धर्मनिरपेक्ष देश… धार्मिक स्थळांवर हल्ल्याचा दावा खोटा
हिंदुस्थानी लष्कराने मशिदींचे, गुरुद्वारांचे नुकसान केल्याचा पाकिस्तानचा दावा आहे, परंतु हिंदुस्थान हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. हिंदुस्थानचे लष्कर त्याचे मूल्य जाणते. त्यामुळे आम्ही धार्मिक स्थळांवर हल्ले केले असा पाकिस्तानने केलेला दावा पूर्णपणे खोटा आहे, असे कर्नल सोफिया कुरेशी यांनी नमूद केले. हिंदुस्थानने पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या. ही कारवाई नेमकी आणि अचूक होती, असेही त्यांनी सांगितले.
अखनूरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये सायंकाळी 5 वाजल्यापासून युद्धबंदी लागू झाली, मात्र त्यानंतर सुमारे तीन तासांनी अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार आणि तोफगोळय़ांचा मारा करण्यात आला. त्यामुळे पाकिस्तानच्या कुरापती काही थांबत नसल्याचेच पुन्हा समोर आले आहे. दरम्यान, जम्मू-कश्मीर सरकारने पाकिस्तानच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. दुसरीकडे शस्त्रसंधीपूर्वी पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे आठ जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे.
जबलपूरमध्ये लष्करी क्षेत्राचे पह्टो काढल्याबद्दल दोघांना अटक
मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये लष्करी क्षेत्राचे पह्टो काढल्याबद्दल दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. मोहम्मद जुबैर (32) आणि मोहम्मद इरफान (22) अशी त्यांची नावे आहेत. कोणत्याही कारणाशिवाय दोघे अनौपचारिक पद्धतीने पह्टो काढत होते. दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
चार राज्यांमधील ब्लॅकआऊट रद्द
युद्धबंदीनंतर राजस्थान, पंजाब, हरयाणा आणि गुजरातमधील ब्लॅकआऊट रद्द करण्यात आला. हरयाणामार्गे पंजाब आणि राजस्थानला जाणाऱया सहा गाडय़ांच्या फेऱया पूर्ववत करण्यात आला, तर पश्चिम रेल्वेने सुरक्षेच्या कारणास्तव गुजरातमधील भूजमार्गे राजस्थानला जाणाऱया रात्रीच्या गाडय़ा स्थगित केल्या असून काही गाडय़ा थांबवण्यात आल्या आहेत किंवा रद्द करण्यात आल्या आहेत.
जम्मू रेल्वे स्थानकावर कामगारांची गर्दी
जम्मू आणि कश्मीरमधील सद्यस्थितीमुळे जम्मू रेल्वे स्थानकावर स्थलांतरित कामगारांची मोठी गर्दी दिसली. जम्मूतील अनेक निवासी भागात झालेल्या गोळीबारानंतर गर्दी वाढत चालल्याचे चित्र आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री, उपराष्ट्रपतींची मोदींशी चर्चा
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माकाx रुबियो यांनी उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स आणि मी स्वतः गेल्या 48 तासांपासून हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याचे स्पष्ट केले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, लष्करप्रमुख असीम मुनीर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशीही चर्चा झाली. मला हे कळवण्यास आनंद होत आहे की, पाकिस्तान आणि हिंदुस्थान सरकारने युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, असे रुबियो म्हणाले.
चार दिवस धुमश्चक्री
22 एप्रिल रोजी जम्मु-काश्मिरात पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार करून 26 निरापराध पर्यटकांचा बळी घेतला. याचा जबरदस्त बदला हिंदुस्थानी लष्कराने मंगळवारी (दि. 6) मध्यरात्री घेतला. पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले. 100 वर दहशतवाद्यांचा खात्मा केला. यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने जम्मु-काश्मिर, पंजाब, राजस्थान या सीमा भागातील गावांना टार्गेट करत गोळीबार सुरू केला. ड्रोन, क्षेपणास्त्र्ाs हल्ले सुरू केले. मात्र हिंदुस्थानी लष्कर, हवाई दलाने पाकिस्तानचा एकाही हल्ला यशस्वी होऊ दिला नाही. पाकडय़ाचे सर्व ड्रोन, क्षेपणास्त्र्ाs नष्ट केली. हिंदुस्थानने जोरदार प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानच्या चिंधडय़ा उडवल्या. चार दिवस ही धुमश्चक्री सुरू होती. मात्र आता युद्ध विरामाची घोषणा झाली आहे.
पाकिस्तानची हवाई हद्द बंद
पाकिस्तानने स्थानिक वेळेनुसार रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व हवाई वाहतुकीसाठी त्यांचे हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद केले आहे. त्यामुळे पाकिस्तानचे हवाई क्षेत्र पूर्णपणे ओसाड पडल्याचे फ्लाइट ट्रकिंग डेटामधून दिसून आले आहे. पाकिस्तानने सुरुवातीला त्यांचे हवाई क्षेत्र हे सर्व प्रकारच्या विमानांसाठी शनिवारी पहाटे सवातीन वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत बंद असेल असे नोटीस टू एअरमेनमध्ये जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा नोटीस टू एअरमेन जारी करत हवाई क्षेत्र रविवारी दुपारपर्यंत बंद ठेवण्यात येईल अशी घोषणा केली. दरम्यान, शुक्रवारी उशिरा हिंदुस्थानने उत्तर आणि पश्चिमेकडील 32 विमानतळं नागरी विमानांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. ही विमानतळं 15 मे रोजी पहाटे साडेपाच वाजेपर्यंत बंद असणार आहेत.
हिंदुस्थानने पाकडय़ांना ठणकावले… आता जे होईल त्याला तुम्हीच जबाबदार
पाकिस्तानचे दावे खोटे; हे घ्या पुरावे
हिंदुस्थानची एस-400 आणि ब्राह्मोस मिसाईल यंत्रणा, हिंदुस्थानी हवाई दलाचे तळ उद्ध्वस्त केल्याचे दावे पाकिस्तानने केले होते. हे सर्व दावे खोटे असल्याचे कर्नल सोफिया कुरेशी यांनी पह्टो दाखवत सांगितले. सिरसा, जम्मू, पठाणकोट आणि भूज येथील हवाई तळावर हल्ले केले. चंदिगड आणि बियास येथील शस्त्रागार डेपोवर हल्ला झाला हा दावाही खोटा आहे, असे कुरेशी म्हणाल्या.
चोख प्रत्युत्तर, लढाऊ यंत्रणा उद्ध्वस्त
पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर देताना स्कर्दू, जाकुबाबाद, सरगोडा आणि बुलारी येथील हवाई तळांना टार्गेट केले. पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली आणि रडार प्रणाली पूर्णपणे उद्ध्वस्त केली. त्यांच्या लढाऊ यंत्रणेचे हिंदुस्थानी लष्कराने प्रचंड नुकसान केल्याचे कर्नल कुरेशी म्हणाल्या.
सिंधू जल कराराला स्थगिती कायम
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने सिंधू जल कराराला स्थगिती दिली होती. ही स्थगिती युद्धबंदीच्या घोषणेनंतरही कायम राहणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. एएनआयने परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांचा हवाला देत याबाबत स्पष्ट केले आहे. युद्धबंदीच्या आधी किंवा नंतरच्या कोणत्याही अटी लादण्यात आलेल्या नाहीत, असेही सांगण्यात आले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली. याबाबत ट्रम्प यांनी सायंकाळी साडेपाच वाजता ‘एक्स’वरून पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. अमेरिकेच्या मध्यस्थीने दीर्घ चर्चेनंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानने हल्ले त्वरित पूर्णपणे थांबवण्यास सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांनी सामंजस्याने हा निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, असे ट्रम्प यांनी नमूद केले.
ही कसली शस्त्रसंधी?
जम्मू आणि कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ही कसली शस्त्रसंधी, असा सवाल ‘एक्स’वरून केला आहे. श्रीनगरमध्ये स्पह्टांचे आवाज ऐकू येत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
चीनचा पाकिस्तानला पाठिंबा
सार्वभौमत्व, क्षेत्रीय अखंडता आणि स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आम्ही पाकिस्तानसोबत उभे असल्याचे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी म्हणाले. वांग यी यांनी आज पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांच्यासोबत पह्नवरून चर्चा केली. त्यानंतर त्यांनी चीनची भूमिका जाहीर केली.
याच पाच दहशतवाद्यांचा लष्कराने खात्मा केला
पहलगामचा बदला घेत हिंदुस्थानने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर हवाई हल्ला चढवत हे तळ उद्ध्वस्त केले. त्यात लश्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे पाच टॉप कमांडर ठार झाले.
मुदस्सर खादियान खास
तोयबाचा हा दहशतवादी मुदिरकेच्या मरकज तोयबा दहशतवादी तळाचा प्रमुख होता. त्याला पाकिस्तानी सैन्याकडून गार्ड ऑफ ऑनर दिला गेला. पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी त्याला श्रद्धांजलीही वाहिली. त्याचा नमाज-ए-जनाजा सरकाळी शाळेत झाला. यावेळी लेफ्टनंट जनरल आणि पंजाब पोलीसचे आयजी उपस्थित होते.
हाफिज मुहम्मद जमील
जैश-ए-मोहम्मदचा हा दहशतवादी मोस्ट वॉण्टेड मसूद अझहरचा मेहुणा होता. हा बहावलपुरातील मरकज सुब्हान अल्लाह या तळाचा प्रभारी होता. मुस्लिम तरूणांमध्ये कट्टरवाद भिनवणे, फंडिग करणे हे याचे काम होते.
मोहम्मद युसूफ अझहर
मसूद अझहरचा मेहुणा. मोहम्मद हा जैशचा दहशतवादी होता. तो दहशतवाद्यांना हत्यारे चालविण्याचे ट्रेनिंग देत असे. जम्मू-कश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यात आणि आयसी-814 विमान अपहरणात याचा हात होता.
खालिद ऊर्फ अबू आकशा
तोयबाचा हा दहशतवादी जम्मू-कश्मीरमधील अनेक हल्ल्यांमध्ये सामील होता. अफगाणिस्तानातून हत्यारांची तस्करी करण्यात त्याचा हात होता. फैसलाबादमध्ये झालेल्या त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी पाक सेनेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मोहम्मद हसन खान
जैशचा हा दहशतवादी म्हणजे पाकव्याप्त भारतातील ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खानचा मुलगा. जम्मू-कश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यात याचा सहभाग होता.