
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल करार स्थगित करून आणि ‘ऑपरेशन सिंदूर’चा तडाखा देऊन हिंदुस्थानने पाकिस्तानची चोहोबाजूंनी काsंडी केली. दुसरीकडे बलुच लिबरेशन आर्मीकडून होत असलेले हल्ले आणि तिथे सरकारविरोधातील उभा राहिलेला ज्वलंत संघर्ष अशा कात्रीत सापडलेल्या पाकिस्तानात आता सिंधू पाणी प्रश्न पेटल्याचे समोर आले आहे. आता सिंधू नदीवरील वादग्रस्त सहा कालव्यांच्या प्रकल्पाविरोधात नागरिक पेटून उठले असून रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलकांनी आज थेट सिंध प्रांताचे गृहमंत्री झिया उल हसन लंजर यांचे घर पेटवून दिले. आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गानजीक मोरो शहरातील मंत्र्यांच्या निवासस्थानावरही हल्ला चढवला.