पाकिस्तान चीनच्या खांद्यावर बसून चंद्रावर जाणार

पाकिस्तानचा अंतराळ कार्यक्रम हिंदुस्थानपेक्षा 10 वर्षे आधी सुरू झाला. मात्र तरीही तो हिंदुस्थानपेक्षा 25 वर्षे मागे आहे. आता तर पाकिस्तान चीनच्या मदतीने चंद्रावर आपले रोव्हर पाठवणार आहे. 2028 मध्ये चीनच्या चांग 4 मिशनसोबत पाकिस्तानचे रोव्हर चंद्रावर जाईल. याशिवाय 2035 पर्यंत चंद्रावर आपले अंतराळयान उतरवण्याची पाकिस्तानची योजना आहे. पाकिस्तानचे योजना आणि विकास मंत्री अहसान इक्बाल यांनी चीनच्या अंतराळ व अणुऊर्जा अधिकाऱ्यांची नुकतीच भेट घेतली. या ल्यूनार रोव्हर मिशनची जबाबदारी पाकिस्तानची अंतराळ संशोधन संस्था ‘सुपाकाx’ला देण्यात आलीय. ‘सुपाकाx’ संस्थेने आतापर्यंत स्वबळावर एकही यान अंतराळात पाठवलेले नाही. ‘सुपाकाx’ने सर्व उपग्रह चीनच्या मदतीने अंतराळात पाठवले आहेत. पाकिस्तानचे रोव्हर 35 किलो वजनाचे असेल. ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लाँच केले जाऊ शकते.