
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने उचललेल्या कठोर पवालांनी पाकिस्तानची तंतरली आहे. प्रत्यक्ष युद्ध करण्याची त्यांची क्षमता नसल्याचे तसेच त्यांना दारुगोळा आणि श्सत्रसाठ्याची टंचाई भासत आहे, असेअहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाकड्यांच्या नियंत्रण रेषेवर कुरापती सुरुच आहेत. पाकिस्तानी सैन्याने रविवारी सलग अकराव्या रात्री नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. हिंदुस्थानी लष्कराने या गोळीबाराला जबरदस्त प्रत्युत्तर दिले.
4-5 मे रोजीच्या रात्री पाकिस्तानी सैन्यायने जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूरच्या नियंत्रण रेषेवर लहान शस्त्रांनी गोळीबार केला. हिंदुस्थआनी लष्कराने या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू असल्याने हिंदुस्थानी लष्कर सतर्क असून ते चोख प्रत्युत्तर देत आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सलग नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात येत आहे. रविवारी सलग अकराव्या दिवशी पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. हिंदुस्थानी लष्कराने सीमेवर झालेल्या गोळीबाराला लगेच आणि तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले.