पाकड्यांकडून सलग पाचव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन; कुपवाडा, बारामुल्लामध्ये गोळीबार

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. बारामुल्ला येथील कुपवाडाजवळ सलग पाचव्या रात्री पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकड्यांकडून सलग पाचव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानसोबत वाढत्या तणावादरम्यान जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैन्याने सलग पाचव्या रात्रीही युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. पाकड्यांच्या या आगळीकीला हिंदुस्थानी सैन्याकडून जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावादरम्यान हा गोळीबार कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यांजवळील अखनूर सेक्टरजवळ झाला. 28-29 एप्रिलच्या रात्री पाकिस्तानी सैन्याने कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यांजवळील भागात तसेच अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करण्यात आला. सुरक्षा दलाने या हल्ल्याला प्रभावी प्रत्युत्तर दिले आहे, असे लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे.