
मलेशियात स्टुडंट व्हिसावर येऊन तिथे भीक मागणाऱ्या 77 पाकिस्तानी तरुणांना मलेशियन पोलिसांनी अटक केली. सार्वजनिक ठिकाणी व चौकाचौकात अनेक तरुण भीक मागत असून भीक न मिळाल्यास मारामारी-भांडण करत असल्याची तक्रार मलेशियन नागरिकांनी केली होती. त्यावरून मलेशियाच्या पोलिसांनी ठिकठिकाणी छापेमारी केली आणि 80 जणांना अटक केली. त्यापैकी 77 जण पाकिस्तानचे तर तीन जण बांगलादेशचे तरुण आहेत. ते सगळे स्टुंडट व्हिसावर मलेशियात आले. मात्र ते कोणत्याही कॉलेजमध्ये शिकत नसल्याची धक्कादायक बाब उघड झालीय. या सगळ्यांना त्यांच्या मायदेशी पाठवण्याची तयारी केली जात आहे.