पंकजा मुंडे ईव्हीमधून विधान भवनात

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक वाहनातून आज विधान भवनात पोहोचल्या. पर्यावरण मंत्री या नात्याने प्रदूषण रोखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनातून प्रवास करत प्रतीकात्मक संदेश देत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ईव्ही वाहनांचा वापर करावा, जेणेकरून वातावरणातील प्रदूषण कमी होण्यास फार मोठी मदत होईल, असे आवाहनही त्यांनी केले.