उमेद – दृष्टीहीनांचे देवदूत

>> पराग पोतदार

वयाच्या तिसऱ्या वर्षी आपली दृष्टी गमाविलेल्या दत्तू अगरवाल यांनी दृष्टीहीन मुलींच्या आयुष्यात आशेचा प्रकाश निर्माण केला आहे. हिंमत न हारता त्यांनी दृष्टीहीन मुलींसाठी मातोश्री अंबुबाई निवासी शाळा सुरू केली असून तिथे शंभर दृष्टीहीन मुलींचे मोफत शिक्षण आणि वसतिगृहाची सोयही केली आहे.

दृष्टीहीन व्यक्तींना समाजाकडून सहानुभूतीने बघितले जाते. मात्र, त्यांना मदत करण्यासाठली फार कमी लोक पुयेतात. परंतु, समाजभान ठेवत काही लोक त्यांच्या प्रगतीसाठी पुयेत असल्याची काही उदाहरणे समोर येत आहेत. याचाच प्रत्येय कर्नाटकमधील दृष्टीहीन 66 वर्षीय दत्त अग्रवाल यांच्या रूपाने पुआले आहे. त्यांनी शंभर दृष्टीहीन मुलींसाठी मोफत शिक्षण आणि वसतिगृहाची सोय केली आहे. त्यांच्या या कार्यामुळे या मुलींच्या आयुष्यात आशेचा प्रकाश निर्माण झाला आहे.

वयाच्या तिसर्या वर्षी आपली दृष्टी गमाविलेल्या दत्तु अगरवाल यांनी हिंमत न हारता दृष्टीहीन मुलींसाठी मातोश्री अंबुबाई निवासी शाळा सुरू केली आहे. तिथे शंभर दृष्टीहीन मुलींचे मोफत शिक्षण आणि वसतिगृहाची सोय करण्यात आली आहे.

कलबुर्गी येथे जन्मलेल्या आणि वाया दत्तू यांना वयाच्या तिसर्या वर्षी न्यूमोनिया झाला, ज्यामुळे त्यांची दृष्टी कमी झाली. त्यांची दृष्टी गेली त्याआधीचे जग त्यांना आठवत नसले तरी त्यांच्या पालकांनी त्यांना स्वातंत्र्य आणि स्वावलंबी करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यामुळे त्यांचे जीवन बदलले. ते वयाच्या आठव्या वर्षी कलबुर्गी येथील दृष्टीहीन मुलांच्या शाळेत जाऊ लागले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी गुलबर्गा विद्यापीठात राज्यशास्त्राचा अभ्यास केला. 1985 मध्ये त्यांनी त्याच विद्यापीठात अध्यापन करण्यास सुरुवात केली. 35 वर्षांहून अधिक काळ त्यांनी तेथे राज्यशास्त्र शिकवले.

1990 मध्ये त्यांनी हैदराबाद कर्नाटक डिसेबल्ड सोसायटी नावाच्या ट्रस्टची स्थापना केली. या अंतर्गत त्यांनी दृष्टिहीन मुलींसाठी एक निवासी शाळा देखील स्थापन केली. त्यांच्या समुदायातील लोकांना, विशेषत लहान मुलींना, त्रास सहन करताना पाहून त्यांनी हा निर्णय घेतला. हे सर्व करण्याची प्रेरणा त्यांच्या आईने त्यांना दिली.

त्यांच्या शाळेतील मुली या कलबुर्गी, बिदर, यादगीर, रायचूर, कोप्पल आणि बेल्लारी या सहा जिह्यांतील आहेत. शाळा एसएसएलसी परीक्षेत उल्लेखनीय 100 टक्के यश मिळवते. विद्यार्थिनी 85 टक्क्यांहून अधिक गुण मिळवतात आणि प्रथम श्रेणीत येतात. विद्यार्थिनींचे यश केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरते मर्यादित नाही. या प्रतिभावान विद्यार्थिनींना नृत्य, नाटक, संगीत, क्रीडा आणि इतर क्षेत्रांमध्ये विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पुरस्कार जिंकून स्वतसाठी आणि त्यांच्या शाळेसाठी ओळख निर्माण केली आहे.

याविषयी दत्तु अगरवाल म्हणतात, भारतातील अनेक भागात, मुलींना अजूनही एक ओझे मानले जाते. अपंग मुलींचे जीवन कसे असेल याची मी कल्पनाही करू शकत नाही.’ त्यांना स्वातंत्र्याचे जीवन घडवण्याचा मार्ग द्यायचा आहे.

शाळेच्या मुख्याध्यापिका संगीती ठाकूर म्हणतात, ‘कर्नाटकमध्ये दृष्टीहीन मुलींसाठी खूप कमी संधी आहेत. आमच्यासारख्या शाळा, त्या मुलींना मोफत शिक्षण आणि निवास देतात, त्या काळाची गरज आहेत. जर या मुलींना शिक्षण मिळाले नाही तर त्यांची अवस्था दयनीय होईल. जेव्हा मी त्यांना पाहते तेव्हा मला फक्त प्रतिभा आणि सर्जनशीलता दिसते. आमच्याकडे मुलींचे सात बॅच आहेत. ज्यांनी येथे शिक्षण पूर्ण केले आहे आणि चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला आहे,’

समाजकार्य ठरवून करता येत नाही. त्याची जाणीव होणे गरजेचे असते. म्हणूनच दत्तु अगरवाल यांच्या कार्याचा आदर्श ठेवत वंचितांच्या जीवनात प्रकाश निर्माण करायचा वसा घ्या.

(लेखिका महिला प्रश्नांच्या अभ्यासक आहेत.)