
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र सोमवारपासून सुरू झाले आहे. या दुसऱ्या सत्रातही दोन्ही सभागृहात गदारोळ झाला आहे. संसदेचे कामकाज होत नसल्याने पीठासीन अध्यक्षांनी संसदेच्या अधिकवेशनासाठी होणार खर्च आणि रखडलेली कामे याची जाणीव करून दिली. मात्र, त्याचवेशी आखाती युद्धामुळे होणारे नुकसान आणि संभाव्य धोक्यांची जाणीव विरोधकांनी करून दिली आहे. तसेच सरकार चर्चेसाठी का घासरत आहे? असा परखड सवाल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.
संसदेच्या आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, आखाती देशातील संकटामुळे किती नुकसान होईल? एका बदलाच्या दिशेने लढा सुरू आहे. यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होईल. तुम्ही शेअर बाजारातील नुकसाम पाहिले आहे. पंतप्रधान मोदींनी अमेरिकेशी करार केला आहे. त्याचाही देशाला मोठा फटका बसणार आहे. त्यांनी हा करार नेमक्या कोणत्या दबावाखाली केला आहे? असे काय घडले की, त्यांना तातडीने करार करण्याची गरज पडली. तसेच पंतप्रधान इस्रायल दौऱ्यावरून आल्यावर लगेचच युद्धाला सुरुवात झाली. या सर्व मुद्द्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
अशा देशासाठी महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात त्यांना काय अडचण आहे? त्यानंतर आपण इतर मुद्द्यांवर चर्चा करू शकतो. सध्या आखाती युद्ध हा देशासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. ते सरकारला महत्त्वाचे वाटत नाही का? इंधनाची किंमत आणि आर्थिक विध्वंस हे चर्चेचे महत्त्वाचे विषय नाहीत का? हे सार्वजनिक मुद्दे आहेत. आम्ही हे महत्त्वाचे मानतो आणि आम्हाला त्यावर चर्चा हवी आहे…पण त्यांना चर्चा नको आहे कारण त्यातून इतर गोष्टी बाहेर येतील, पंतप्रधानांची भूमिका त्यातून बाहेर येईल. त्यांच्याशी कशी तडजोड केली जाते आणि त्यांना कसे ब्लॅकमेल केले जात आहे हे स्रव उघड होईल. म्हणून, ते चर्चा करू इच्छित नाहीत. पंतप्रधान संसदेतून कसे पळून गेले हे तुम्ही पाहिले आहे. ते आता पुन्हा येऊ शकणार नाहीत, मी तुम्हाला सांगत आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टिकास्त्र सोडले.
#WATCH | Delhi: Lok Sabha LoP Rahul Gandhi says, “How much loss would the West Asia crisis cause? A fight towards a paradigm shift is going on. This will cause a major loss to our economy. You saw the stock market. PM Modi has signed the deal with the US. The country is going to… pic.twitter.com/IlbMABStTZ
— ANI (@ANI) March 9, 2026





























































