
पेटीएमने टोटल बॅलन्स ह्यू हे नवीन फीचर बाजारात आणले आहे. या फीचरचा वापर करून पीटेएम वापरकर्ते आता केवळ एकदाच यूपीआय पिन टाकून त्यांच्या सर्व बँक खात्यांमधील एकूण रक्कम तपासू शकतील. या नवीन टूलद्वारे, यूपीआयशी लिंक केलेल्या सर्व खात्यांची एकूण रक्कम एकाच स्क्रीनवर दिसेल. एकापेक्षा जास्त बँक अकाऊंट आहेत आणि ते वेगवेगळ्या अॅप्सवर जाऊन बॅलन्स तपासतात अशा लोकांसाठी हे फीचर फायद्याचे ठरणार आहे.