राज ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अटकेत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. सुजित दुबे असे त्याचे नाव आहे. तर दुसरीकडे सुजित दुबेचे दुकान पह्डल्या प्रकरणी तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.

सुजित अंधेरी पूर्व परिसरात राहतो. त्याने दारूच्या नशेत राज ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणी अँथोनी डिसोझा याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दुबेविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. आक्षेपार्ह व्हिडीओमुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्त्याने दुबेचे दुकान फोडले.  आज वांद्रे न्यायालयाबाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस बंदोबस्तात त्या चौघांना न्यायालयात हजर केले होते.