
सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली. यांच्या आत्महत्येकडे कानाडोळा करणाऱ्या राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा निषेध करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाक क्रमांक 11 च्या वतीन किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीतर्फे “रुपाली चाकणकर हटाव, लाडक्या बहिणी बचाव” आंदोलन करण्यात आलं.

यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिलांनी विविध पोस्टर्सच्या माध्यमातून रुपाली चाकणकर यांचा निषेध केला.

“पक्षपाती भुमिका घेणाऱ्या रुपाली चाकणकर यांचा निषेध”, “रुपाली चाकणकर हटाव लाडक्या बहिणी बचाव”,

असे पोस्टर्स हातात घेऊन आणि घोषणा देऊन शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.