Photo : सुप्रिया सुळे यांच्या मुलाने मिळवली पदवी, पाहा फोटो

बारामतीतून चार वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांचा मुलगा विजय सुळे याने युनिव्हर्सिटी ऑफ सेंट अँड्र्यूजमधून पदवी मिळवली आहे. या पदवीप्रदान सोहळ्याचे फोटो सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोत सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे, मुलगा विजय सुळे व मुलगी दिसत आहेत.