Photo – कॅन्सरसोबत लढता लढताच हिना खानने बांधली लग्नगाठ, बॉयफ्रेंड रॉकीसोबत झाली विवाहबद्ध

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री ही गेल्या काही महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज देत आहे. या आजारपणात तिचा लाँगटाईम  बॉयफ्रेंड रॉकीने तिची खूप साथ दिली. हिना व रॉकी गेली अनेक वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. अखेर हिनाने रॉकीसोबत लग्नगाठ बांधली आहे. हिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. तिने त्या दोघांच्या लग्नाचे अतिशय सुंदर फोटो शेअर केले आहेत.