
टीम इंडियाचा डावखुरा फिरकीवीर कुलदीप यादव हा त्याची बालपणीची मैत्रिणी वंशिका चड्डासोबत लग्नबंधनात अडकला आहे.

उत्तराखंडमधील मसूरी येथील सवॉय हॉटेलमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला.

लग्न सोहळ्याला रिंकू सिंह, शुभम दुबे, सुरेश रैना, युझवेंद्र चहल, मोहम्मद कैफ, तिलक वर्मा व नितीश राणा यांनी हजेरी लावली.

लग्नात कुलदीपने आयव्हरी रंगाची शेरवानी घातली होती. तर वंशिकाने लाल रंगाचा लेहेंगा घातला होता. या लग्नासाठी सवॉय हॉटेलला सुंदर फुलांची सजावट केली होती.


























































