
मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ हिने बॉलिवूडमध्ये आपला चांगलाच जम बसवला आहे. या महिन्यात शर्वरीचे एका पाठोपाठ एक असे दोन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. नुकतीच शर्वरीने कृतिका कामरा हिच्या लग्नाला हजेरी लावली. त्यावेळी तिने सुंदर अशी पेस्टल रंगाची लेहेंगा चोळी घातली होती. त्यावर तिने मोठे कानातले घातले व गळ्यात काही न घालता अगदी मिनिमल लूक ठेवला होता.




























































