
महिला प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी मुंबई उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये लवकरच गुलाबी कोच सुरू केली जाणार असल्याची माहिती आहे. राज्य सरकार लवकरच या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाला पत्र पाठवणार आहे. मुंबईत महिलांसाठी विशेष लोकल सोडल्या जातात तरीही गर्दी कायम असल्याने प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

























































