लोकांचे कल्याण, जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी काम करू, नरेंद्र मोदी यांचा ट्रम्प यांच्याशी फोनवरून संवाद

माझे प्रिय मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलून खूप आनंद झाला. त्यांच्या ऐतिहासिक दुसऱया कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा. परस्पर विश्वास आणि विश्वसनियता वाढवण्यासाठी आपण दोघेही कटिबद्ध असून लोकांचे कल्याण, जागतिक शांतता, समृद्धी आणि सुरक्षेसाठी एकत्र काम करू असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना उद्देशून म्हटले आहे. मोदींनी आज ट्रम्प यांच्याशी फोनवरून संवाद साधला.

हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात असलेल्या संबंधांबद्दल मोदी आणि ट्रम्प यांच्यात चर्चा झाली. मोदींनी ट्रम्प यांना पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी ट्रम्प यांनीही मोदींच्या लोकप्रियतेबद्दल त्यांची स्तुती केली आणि येणाऱया काळात एकत्र काम करू अशी अपेक्षाही व्यक्त केली.