
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. हिंदुस्थान पाकिस्तान तणाव व ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान काय बोलणार हे याकडे साऱ्या देशाचे लक्ष आहे.
Prime Minister Narendra Modi will address the nation at around 8 PM today. pic.twitter.com/NobQiY66Nh
— ANI (@ANI) May 12, 2025
जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी या हल्ल्यात महिला व मुलांसमोर त्यांच्या घरातील पुरुषांची हत्या केली. या हल्ल्यात अनेक महिलांनी आपले पती गमावले. त्यामुळे या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवले. 7 मे च्या मध्यरात्री हिंदुस्थानी हवाई दलाने पाकिस्तान व पाकव्याप्त कश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उडवले. त्यानंतर हिंदुस्थान पाकिस्तानमधील तणाव वाढला. पाकिस्तानने जम्मू कश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये ड्रोन हल्ले करायचा प्रयत्न केला. मात्र हिंदुस्थानने चोख प्रत्युत्तर देत पाकड्यांचे सर्व ड्रोन व अनेक लढाऊ विमानं पाडली. त्यानंतर दोन्ही देशात युद्धविरामावर एकमत झाल्यानंतरही पाकिस्तानने सीमेवरील गोळीबार सुरुच ठेवला आहे.