प्रधानमंत्री पोषण आहार, हिरव्या वाटाण्याऐवजी पांढरा खरेदी केला; सचिवस्तरावर होणार चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेंतर्गत 134 रुपये प्रति किलो दर निश्चित करून हिरवा वाटाणा खरेदी करण्यासाठी निविदा काढण्याचे आदेश देण्यात आले होते. शिक्षण संचालनालयामार्फत देण्यात आलेले हे आदेश डावलून हिरव्या वाटाण्याऐवजी 30 ते 40 रुपये किलो दर असलेला पांढरा वाटाणा खरेदी करून शालेय पोषण आहारात शेकडो कोटींचा अपहार करण्यात आल्याकडे शिवसेना आमदार पैलास पाटील यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी विधानसभेत केली. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याची गंभीर दखल घेत या प्रकरणाची सचिवस्तरावर चौकशी करण्याचे आदेश दिले.