बीडमध्ये आठवले गँगला ‘मकोका!’

जिल्हय़ातील गँगवॉर थेट स्वतःच्याच मुळावर आल्यानंतर काळझोपेतून जाग आलेल्या पोलिसांनी आता ‘मकोका’चे हत्यार उपसले आहे. वाल्मीक कराड गँगला ‘मकोका’ लावल्यानंतर आता पोलीस अधिकाऱ्याची क्लिप व्हायरल करणाऱ्या सनी आठवले गँगला ‘मकोका’ लावण्याची सद्बुद्धी पोलिसांना झाली आहे.

या गँगमध्ये सनी आठवले, अक्षय आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर, ओंकार सवई आदींचा समावेश आहे. पोलीस अधिकारी शीतल कुमार बल्लाळ यांच्या संभाषणाची क्लीप सनी आठवलेने सोशल मिडीयावर व्हायरल केली होती.

सुदर्शन घुलेच्या कोठडीत वाढ

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याच्या एसआयटी कोठडीत आज चार दिवसांची वाढ करण्यात आली. तपास यंत्रणांनी त्याच्याकडील दोन मोबाईल ताब्यात घेतले आहेत. एका मोबाईलमधील डाटा पह्रेन्सिक तंत्रज्ञांनी परत मिळवला आहे. मात्र दुसऱया मोबाईलचा पासवर्ड सापडत नसल्यामुळे घुलेच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी तपास यंत्रणांनी केली होती.

दोनशे वाल्मीकप्रेमी पोलिसांना हटवा

बीड पोलीस दलात आजही दोनशेपेक्षा जास्त वाल्मीकप्रेमी पोलीस असल्याचा खळबळजनक गौप्यस्पह्ट भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला. या पोलिसांच्या जिल्हय़ाबाहेर बदल्या करण्याची मागणीही आमदार धस यांनी केली. वाल्मीकप्रेमी पोलिसांमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावर परिणाम होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, वाल्मिक कराडची आज जिल्हा रुग्णालयातून मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.