गुन्हा रद्दच्या अर्जावर पोलीस गप्पच, कोर्टात म्हणणे मांडलेच नाही

वडगावशेरीतील मालमत्ता बळकावल्याच्या प्रकरणात दाखल गुन्हा रद्द करण्याच्या अर्जावर पोलिसांनी न्यायालयात आपले म्हणणे मांडलेच नाही, अशी बाब आता समोर आली आहे.

याबाबत कोरेगाव पार्कातील रहिवासी सुमनदेवी चंदुलाल तालेरा (78) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, सुमनदेवी आणि त्यांची जाऊ सुशिलादेवी यांनी 1974 मध्ये संयुक्तपणे एक जमीन विकत घेतली होती. नंतर विभागणीच्या वेळी सुशिलादेवींनी ठरल्यापेक्षा अधिक क्षेत्र घेतल्याने सुमनदेवींना तीन प्लॉट देण्याचे ठरले होते. मात्र, जानेवारी 2024 मध्ये आरोपींनी या प्लॉटचे बनावट दस्त तयार करून ताबा घेतला व विक्री केली, असा आरोप तक्रारीत आहे. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने तक्रारदारांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर तसेच पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि उपायुक्त सोमय मुंडे यांच्या हस्तक्षेपानंतर तिघांवर विश्वासघात, फसवणूक आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, आरोपींनी दाखल केलेली क्रिमिनल रिव्हिजन याचिका सत्र न्यायालयाने मंजूर केली, आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा गुन्हा नोंदविण्याचा आदेश रद्द केला. तसेच पुढील कार्यवाही भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 223 अंतर्गत करावी, असे नाही. निर्देश दिले. मात्र, या सुनावणीत पोलिसांनी कोणतीही भूमिका नोंदवली तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मालमत्तेवर अनोळखी व्यक्तींनी बेकायदा ताबा घेताना तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने त्यांच्या व्यवस्थापकाला दमदाटी केली होती. याच निरीक्षकावर अलीकडेच बेकायदेशीर जमिनीच्या व्यवहारांप्रकरणी दोन गुन्हे नोंद झाले आहेत.