
मीरा-भाईंदरच्या या मोर्चात सहावीत शिकणारा ओमकार खर्चे हा चिमुकला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात घोडय़ावर स्वार होऊन सहभागी झाला होता. त्याला पाहताच पोलिसांचा वेढा त्याच्याभोवती पडला. मात्र तरीही त्याने आपली कूच थांबवली नाही. या वेळी पत्रकारांनी त्याला गाठून पोलीस काय म्हणाले, असे विचारले असता तो म्हणाला, पोलीस म्हणाले, तुला अटक करतो… तुझ्या घोडय़ाला अटक करतो… इथून निघून जा. पण मी म्हणालो, जाणार नाही. सगळ्यांना मराठी आलीच पाहिजे.