
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले असतानाच, पाटणा येथील भाजप कार्यालयाबाहेर उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेले पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. यातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात असा दावा करण्यात आला आहे की, हे पोस्टर भाजप कार्यकर्त्यांनी फाडले.
याचबाबत पीटीआयने (PTI) देखील वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, गुरुवारी सकाळी भाजप कार्यालयाबाहेर हे पोस्टर्स झळकले. यावर वाल्मिकी समाज, असे नाव लिहिण्यात आले होते. दरम्यान, भाजप कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी यातील काही पोस्टर्स तातडीने काढून टाकले, असे वृत्तात सांगण्यात आले आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेश मीडिया प्रभारी दानिश इक्बाल यांनी सांगितले की, “हे पोस्टर्स कोणी लावले याची आम्हाला माहिती नाही. सध्या आम्ही एवढेच सांगू शकतो की, पुढील मुख्यमंत्री कोण असेल, याचा निर्णय पक्षाच्या परंपरेनुसार एकत्रितपणे घेतला जाईल.”
दरम्यान, नितीश कुमार दिल्लीला गेल्याच्या पार्श्वभूमीवर सम्राट चौधरींचे हे पोस्टर्स लागल्याने बिहारच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
Breaking –
बिहार बीजेपी मुख्यालय के बाहर फाड़े गए सम्राट चौधरी के पोस्टर…
सम्राट चौधरी को मुख्यमंत्री बताते हुए लगाए गए थे पोस्टर…
पोस्टर में लिखा था वाल्मीकि समाज की यही पुकार, बिहार में हो सम्राट सरकार ….
नीतीश कुमार के दिल्ली रवाना होते ही बिहार में राजनीतिक… pic.twitter.com/BtO2WHtsGJ
— Minakshi Shriyan (@Minakshishriyan) April 9, 2026



























































