
पुण्यानंतर आता चंदीगडमध्ये पोर्शे कार अपघाताची पुनरावृत्ती झाली आहे. भरधाव पोर्शेने दुचाकीला धडक दिल्याने तरुणाच्या शरीराचे दोन तुकडे त्याचा जागीच मृत्यू झाला. अंकित असे मयत तरुणाचे नाव आहे. अंकितच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या कार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
अंकितचं कुटुंब मूळचे उत्तराखंडचे असून चंदीगडमध्ये वास्तव्यास होते. मंगळवारी अंकितचा 24 वा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीसाठी सर्व कुटुंबीय जात असतानाच सेक्टर 4 मध्ये चुकीच्या दिशेने भरधाव आलेल्या पोर्शे कारने अंकितच्या दुचाकीसह दोन दुचाकींना धडक दिली. मग खांबावर कार आदळली.
या अपघातात वाढदिवशीच अंकितचा करुण मृत्यू झाला. पोलिसांनी चालकाला अटक करत कार ताब्यात घेतली आहे. चालकाची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने मद्यपान केलं नसल्याचं निष्पन्न झालं आहे. कार कशामुळे अनियंत्रित झाली याबाबत पोलीस तपास करत आहेत.

























































