
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर अजितदादांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी शनिवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एक मोठे विधान केले आहे. प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचा दावा एका मुलाखतीत केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला जोर आला. याबाबत विचारले असता पियुष गोयल म्हणाले की, मला तसे होताना दिसत नसून तसे काही होईल असेही वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेतृत्व आधी अजित पवार यांच्याकडे होते, तर आता सुनेत्रा पवारांकडे आहे. प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
VIDEO | PTI Exclusive: In an interview with PTI CEO & Editor-in-Chief Vijay Joshi, Union Minister Piyush Goyal, when asked about Sunetra Pawar taking oath as Maharashtra’s Deputy Chief Minister following the tragic death of Ajit Pawar, says, “We have an alliance with the NCP… pic.twitter.com/053Hxv7Edj
— Press Trust of India (@PTI_News) January 31, 2026
प्रफुल्ल पटेल यांचा इनकार
दरम्यान, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आल्याचे मी पाहिले. परंतु हे वृत्त निराधार असून यात कोणतेही तथ्य नाही, असे स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी एक्स पोस्ट करून दिले आहे.
I have noted few reports circulating in the media regarding my appointment as the National President of the Nationalist Congress Party. I wish to state with absolute clarity that these reports are totally baseless and lack any truth.
The Nationalist Congress Party is a…
— Praful Patel (@praful_patel) February 1, 2026
पियुष गोयल यांनी व्यक्त केली दिलगिरी
दरम्यान, पियुष गोयल यांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याच्या वृत्ताला इनकार केला. यानंतर गोयल यांनी ट्विट करत दिलगिरी व्यक्त केली.
तटकरे आणि पटेलच सर्व ठरवतात, मला काहीच माहीत नाही; शरद पवारांनी स्पष्ट शब्दांत सांगितले
“एका ज्येष्ठ पत्रकाराने मला चुकीची माहिती दिली होती की, प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या माहितीची शहानिशा न करता मी प्रसारमाध्यमांमध्ये काही विधाने केली होती. मात्र, नंतर ही माहिती चुकीची असल्याचे समोर आले असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच काम करत आहे. या दिशाभूल करणाऱ्या माहितीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो”, असे ट्विट गोयल यांनी केले आहे.
एक वरिष्ठ पत्रकार ने मुझे गलत जानकारी दी थी कि श्री प्रफुल पटेल राष्ट्रवादी कांग्रेस के अध्यक्ष चुने गए हैं। जानकारी की पुष्टि किये बिना मैंने मीडिया में कुछ बयान दिया था किंतु बाद में पता चला जानकारी गलत है और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजीतदादा…
— Piyush Goyal (@PiyushGoyal) February 1, 2026






















































