108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका सातत्याने बंद पडल्याने रुग्णांचे हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याच्या खेड्यापाड्यात वैद्यकीय सेवा देणाऱ्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका मर्यादेपेक्षा जास्त किलोमीटर धावल्याने कालबाह्य झाल्या आहेत. त्या सातत्याने बंद पडत असल्याने आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णांची गैरसोय होत असल्याची कबुली राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरात दिली. राज्यात 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांच्या संख्येत वाढ करण्याच्या संदर्भात मोहन मते यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. 108 क्रमांकाच्या 937 रुग्णवाहिकांपैकी बहुतांश रुग्णवाहिका विहित मर्यादेपक्षा जास्त कालावधी व जास्त किलोमीटर धावल्याने त्या कालबाह्य झाल्याच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील लेखी उत्तरात हे अंशतः खरे असल्याचे उत्तरात नमूद केले आहे.