
महाराष्ट्रातील लोककलांचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांना बंगळुरूमधील नॅशनल यूथ असोसिएशनने मातृभूमी नॅशनल अवॉर्ड जाहीर केला आहे. या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त भारतातील लोकसाहित्य लोककला आणि भाषा क्षेत्रातील दहा मान्यवरांना मातृभूमी नॅशनल अवॉर्डने 13 सप्टेंबर रोजी बंगळुरू येथे सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती कर्नाटकातील लोकसाहित्य अभ्यासक डॉ. एम. एन. व्यंकटेश यांनी दिली.
संस्थेच्या वतीने गौरविण्यात येणाऱया दहा मान्यवरांमध्ये कन्नडारी भट (उडुपी) डॉ. गोविंद वर्माराजा (कालिकत), सोनू दुबे (मध्य प्रदेश) जितेंद्र सोलंकी (मध्य प्रदेश), डॉ. शेष शास्त्राr (आंध्र प्रदेश), डॉ. जक्का सारथी (तामीळनाडू), डॉ. प्रकाश खांडगे (महाराष्ट्र), डॉ. आशा ज्योती (तेलंगणा), डॉ. एस. पी. शिल्पा (केरळ), डॉ. किरण कुमार रोनाल्ड (मलेशिया) यांचा समावेश आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बालाजी आणि अध्यक्ष सी. रमेश यांनी दिली. याआधी डॉ. खांडगे यांना महाराष्ट्र शासनाचे चार पुरस्कार, भारत सरकारचे दोन पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.