
बिग बॉस हिंदीचा 19 वा सिझनचा फिनाले विक सध्या सुरू आहे. प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन महाराष्ट्रीय भाऊ उर्फ प्रणित मोरे, अभिनेता गौरव मोरे, संगीतकार अमाल मलिक, इन्फ्लुएन्सर तान्या मलिक, अभिनेत्री फरहाना भट आणि क्रिकेटपटू दीपक चहरची बहिण मालती चहर हे सहा जण सध्या फिनालेमध्ये आहेत. रविवारी या पैकीच एक जण बिग बॉस 19 चा विजेता ठरणार आहे.
View this post on Instagram
दरम्यान गुरुवारच्या भागाच या सर्व स्पर्धकांना त्यांच्या आयुष्यातील एक घटना सांगायला सांगितली होती. त्या प्रणित मोरेने देखील त्याच्याविषयी सांगितले. प्रणित म्हणाला की, ‘मला माझ्या आई वडिलांना स्वत:च घर द्यायचं होतं. आम्ही 1990 पासून 2025 पर्यंत भाड्याच्या घरात राहत होतो. या वर्षी जुलै 2025 ला मी स्वत:चं घर घेतलं’. स्वत:च्या आयुष्यातील हा किस्सा सांगताना प्रणित भावूक झालेला पाहायला मिळाला.
प्रणित हा बिग बॉसच्या ट्रॉफीचा तगडा दावेदार मानला जात आहे. अनेक बिग बॉस फॉलोअर्सने शेवटच्या दोन स्पर्धकांमध्ये प्रणित असेल असा अंदाज वर्तवला आहे. तर काहींनी प्रणित हा शो जिंकू शकतो असे देखील म्हटले आहे.

























































