
छोटय़ा मुलांना अनेकदा अचानक गालफुगी (गालगुंड) होते. अशावेळी पालक म्हणून नेमके काय करावे हे कळत नाही. सर्वात आधी गालफुगी झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. जर डॉक्टर उपलब्ध नसतील तर यावर काही घरगुती उपायसुद्धा आहेत.
हळद आणि कडुलिंबाच्या पानांची पेस्ट तयार करून गालफुगीच्या भागावर लावल्यास वेदना व सूज कमी होते. शुद्ध कोरफडचा गरदेखील गालफुगीच्या भागावर लावल्यास आराम मिळतो. गालफुगीच्या भागावर गरम किंवा थंड शेक घेतल्यास आराम लगेच मिळतो.