गाजर का हलवा खाया क्या? मोदींचा शुभांशुशी संवाद

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाऊन इतिहास घडवणारे शुभांशु शुक्ला यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. ‘तुम्ही हिंदुस्थानपासून खूप दूर आहात, पण भारतीयांच्या हृदयाच्या जवळ आहात. तुमच्या नावातच शुभ आहे. त्यामुळे तुमचा हा प्रवास हिंदुस्थानी तरुणाईसाठी शुभआरंभ आहे, अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या. ‘गाजर का हलवा खाया क्या’ या मोदींच्या प्रश्नावर दोघांमध्ये हास्यविनोदही रंगला.