
इराण युद्धामुळे जगभरावर इंधन टंचाईचे संकट आले आहे. या संकटावर कशी मात करावी यासाठी हिंदुस्थानसह अनेक देशांमध्ये काथ्याकूट सुरू आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेली सिंपल टेक्नॉलॉजी या संकटकाळात व्हायरल झाली आहे.
मोदी हे गॅस टंचाईवर मात करण्याची एक सिंपल टेक्नॉलॉजी सांगतात. एका रिकाम्या भांड्याला मधून छिद्र करा, त्याला एक पाईप लावा. ते भांडे नालीवर ठेवा आणि त्या नालीच्या गॅसचा वापर करून शेगडी पेटवा अशी टेक्नॉलॉजी आहे. एका मीममध्ये तर एक महिला रिकामे सिलिंडर नवऱ्याला देऊन ते नालीवरून भरून आणायला सांगताना दिसते.
मुख्यमंत्री फडणवीसदेखील मीमकऱ्यांच्या निशाण्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी गॅस दरवाढीवर प्रश्न विचारला. त्यावेळी ते गॅससंदर्भात न बोलता पेट्रोल आणि डिझेलबाबत बोलताना दिसतात. ईव्हीएम आणि मतचोरी करून निवडून गेल्यावर काय होते, अशी टीका त्यातून करण्यात आली.

























































