
ब्रिटनमध्ये दर आठवड्याला शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची सुटका केली जात आहे, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन कैद्यांची काही कारण नसताना सुटका करण्यात आली आहे. यावरून बराच वाद उफाळून आला आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2025 पर्यंत 12 महिन्यांत 262 कैद्यांची चुकून सुटका करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या आता दुप्पट झाली आहे.



























































