
हिंदुस्थानी सिनेसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार ‘ट्रजेडी किंग’ दिलीप कुमार आणि ‘शोमन’ राज कपूर यांच्या आठवणी जपण्याचा निर्णय पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा सरकारने घेतला आहे. त्यांचे बालपण ज्या पेशावरमध्ये गेले तेथील त्यांच्या वडिलोपार्जित घरांचे जतन करण्यासाठी तब्बल 3.38 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
जागतिक बँकेने खैबर पख्तूनख्वा इंटीग्रेटेड टुरिझम डेव्हलपमेंट प्रोजेक्टअंतर्गत खैबर पख्तूनख्वा प्रांतातील वारसा संवर्धनासाठी प्रमुख प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. दिलीप कुमार व राज कपूर जिथे राहत होते त्या इमारती पाकचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी 2014 मध्येच राष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून घोषित केल्या होत्या, मात्र या इमारती आता जीर्ण आणि धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे त्यांचे जतन करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला.