
राष्ट्रपती राजवटीविरोधात इंफाळमध्ये मैतेई संघटनेने राजभवनाला घेराव घातला. मोठ्या संख्येने आंदोलकांनी जमून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांना एम सेक्टर गेटजवळ रोखून धरले होते. राज्यपालांनी ग्वालथाबी येथे घटलेल्या घटनेप्रखरणी माफी मागावी अशी मागणी आंदोलकांची आहे. आंदोलन अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यात 7 आंदोलक जखमी झाले. त्यांना रिप्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्वालथाबी येथे सरकारी बसवर राज्याचे नाव लपवण्यात आले होते. यावरून वाद निर्माण झाला आहे.