
मुंढवा आणि बोपोडी येथील जमीन घोटाळय़ाप्रकरणी शीतल तेजवाणी, निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले, हेमंत गवंडे यांच्यासह चौघांना पोलिसांकडून जबाबासाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे. या प्रकरणांचा तपास खडक पोलीस ठाण्याकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.
नोटीस बजावण्यापूर्वी हेमंत गवंडे स्वतःहून पोलीस आयुक्तालयात हजर राहिले. गवंडे यांनी बोपोडी प्रकरणातील गुन्हा चुकीने त्यांच्या नावावर नोंदवण्यात आल्याचा दावा केला असून आवश्यक कागदपत्रे पोलिसांना सादर केल्याचे सांगितले. मुंढवा प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर गुन्हा दाखल असून बोपोडी प्रकरणात गवंडेसह इतरांवर गुन्हा नोंद आहे. दोन्ही घटनांमध्ये व्यवहारांची कागदपत्रे व नोंदी मागवून तपास करण्यात येत आहे.



























































