
पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला चांगलाच दणका दिला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांनी केलेल्या मोफत योजनांना पुणेकरांनी सपशेल नाकारले आहे. पुण्यात भाजपचा विजयरथ सुसाट धावताना दिसत आहे. अजित पवारांना हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या मोफत योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी म्हटले होते, “घोषणा करायला तुमच्या बापाचं काय जातं” अशी टिका अजित पवार यांच्यावर केली होती. पुण्यात भाजपला 110 जागा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ 12 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाची एकहाती सत्ता आली असून, अजित पवारांना मोठा दणका दिला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे निकाल आता समोर येत असून, नुकत्याच हाती आलेल्या निकालानुसार अजित पवारांना मोठा दणका बसला आहे. भाजपा 84 जागेवर आघाडीवर असून अजित पवारांना केवळ 36 जागांवर आघाडी मिळाली आहे.





























































