Pune News – बारामती पालखी महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर खराडेवाडी नजीक शिर्सुफळ फाट्यावर अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. कार आणि दुचाकीत झालेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. विशाल रामचंद्र कोकरे आणि अजित लक्ष्मण लगड अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार टाटा टिगोर कंपनीची कार गुरुवारी रात्री दौंडकडून बारामतीकडे जात होती. यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीची आणि कारची जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वाराचे शीर धडावेगळे झाले. कारचालकाचाही जागीच मृत्यू झाला. अपघातात एवढा भीषण होता की दुचाकी कारमध्ये घुसली. क्रेनच्या सहाय्याने कारमध्ये घुसलेली दुचाकी बाहेर काढावी लागली.