शिरूरसाठी लवकरच स्वतंत्र पोलीस ठाणे

शहरासाठी लवकरच स्वतंत्र पोलीस स्टेशन व तालुक्यासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असून पोलिसांच्या वसाहतीकरिताही पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी व्यक्त करून शिरूर तालुक्यात कायदा-सुव्यवस्था टिकविण्यासाठी पूर्णपणे पोलिसिंग करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

शिरूर पोलीस स्टेशनचे वार्षिक निरीक्षणासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी आज शिरूर पोलीस स्टेशन येथे भेट दिली व कामकाजाची माहिती घेतली त्यानंतर त्यांनी स्थानिक नागरिक, महिला, पोलीस पाटील व पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.

यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, सहायक पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, महिला दक्षता समितीच्या शोभना पाचंगे, सामाजिक कार्यकर्ते बापू सानप, शशिकला काळे, सविता बोरुडे, रेश्मा शेख उपस्थित होते.

शिरूर शहरातील बसस्थानक परिसरात व पाटबंधारे कॉलनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असून, त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार आहे, तर शाळा-कॉलेज परिसरात मुलींच्या विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत, त्या शाळांना गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी सूचना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शाळा-कॉलेज परिसरात दामिनी पथक व पोलिसांचे काम चांगले असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

शिरूर तालुक्यात एखादा गुन्हा घडत असेल तर किंवा मुलींची छेडछाड होत असेल, तर 112 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहनही पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी करून लवकरच शिरूर पोलीस स्टेशन हे एसटी बसस्थानकाजवळील जागेत स्थलांतर होईल, यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

शिरूर शहर व ग्रामीण भागात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्या. नागरिकांना अडचणींबाबत काही प्रश्न असल्यास माझ्या मोबाईलवर संपर्क साधावा, असे देशमुख