
पुणे शहरात आज सहा गर्भवतींसह एका 35 वर्षीय तरूणाला झिकाचे निदान झाले आहे. झिकामुळे बाळांमध्ये जन्मदोषाचा धोका उद्भवण्याची शक्यता असल्याने नव्याने आढळून आलेल्या सहा गर्भवतींपैकी 18 आठवडे पूर्ण झालेल्या पाच गर्भवतींचे अॅनॉमली स्पॅन करण्यात आले होते, त्याचा रिपोर्ट नॉर्मल आला असल्याचे पालिकेच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे.
एरंडवणे, डहाणूकर कॉलनी, पाषाण, मुंढवा, कळस, लोहगाव, खराडी, कोंढवा, सहकारनगर, घोलेरोड, आंबेगाव बुद्रुक, कोरेगाव पार्क, रामटेकडी परिसरात आतापर्यंत 73 झिकाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. यात गर्भवती महिलांचे प्रमाण अधिक असून आतापर्यंत 32 गर्भवतींना झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. आज डहाणूकर कॉलनीतील 36 वर्षीय तरूणासह तीन गर्भवतींना झिकाचे निदान झाले आहे. या सर्व रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत.