
देशात जिकडे जाल तिकडे तुम्हाला अदानीचं नाव दिसतं. केवळ छत्तीसगड आणि ओडिशातील सरकारच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही अदानीच चालवतात, अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हल्ला चढवला. राज्यातलं सरकार जनतेचं नाही, अदानीसारख्या पाच-सहा अब्जाधीशांचं आहे. त्यांचा डोळा तुमच्या जमिनीवर आहे. येथील जंगलसंपत्तीवर आहे. तुमचं भविष्य त्यांना चोरायचं आहे, अशी तोफ राहुल यांनी डागली. पुरीच्या जगन्नाथ यात्रेत लाखो भाविक चालत होते आणि अचानक एक ड्रामा पाहायला मिळाला. अदानी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी रथ रोखला गेला. यातून मी काय म्हणतोय, ते तुमच्या लक्षात येईल.