
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना तिसऱया रांगेत स्थान देण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. हा प्रोटोकॉलचा भंग आहे, असा हल्ला काँग्रेसने चढवला आहे.
’देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यासोबत असे गैरवर्तन कुठल्या मर्यादा, परंपरा आणि प्रोटोकॉलचे पालन करते? यातून सरकारचा न्यूनगंड दिसतो. लोकशाहीत मतभेद असणे स्वाभाविक आहे. मात्र, सरकारने राहुल गांधी यांच्यासोबत केलेले वर्तन योग्य नाही,’ असे काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला म्हणाले.
2014 चा फोटो केला शेअर
काँग्रेसने 2014 साली झालेल्या प्रजासत्ताक दिनाचा फोटो शेअर केला आहे. त्यात भाजपचे नेते व तत्कालीन विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी हे पहिल्या रांगेत बसलेले दिसत आहेत. हा शिष्टाचार का मोडला गेला? राहुल गांधी अपमान करण्याचा मोदी-शहांचा हेतू होता का?, असा सवाल काँग्रेसने केला.

























































