
हिंदुस्थान आणि अमेरिकेतील व्यापार करार हा आपल्या अन्नदात्यांच्या उपजीविकेवर केलेला थेट हल्ला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्थानच्या शेतकऱयांचा विश्वासघात केला, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. गुन्हे दाखल करा, खटले भरा, हक्कभंग आणा, मी शेतकऱयांसाठी लढत राहणार, असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला आव्हान दिले आहे.



























































