
नरेंद्र मोदी हे मानसिकदृष्टय़ा संपले आहेत. मोदी आता भारताचे पंतप्रधान राहिलेले नाहीत, ते अमेरिकेसाठी काम करत आहेत आणि नरेंदर सरेंडर झाले आहेत, अशा शब्दांत कॉँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि मोदींवर केला.
कांशीराम जयंतीनिमित्त लखनौमध्ये आयोजित कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. आता अमेरिका ठरवत आहे की आपण तेल कुठून घेणार? त्यामुळे ऊर्जा क्षेत्रातील परिस्थिती अजून बिघडेल. राजकारणात पहिला पराभव हा तुमच्या मनात होतो. मोदी सध्या पराभूत मानसिकतेत असून ते अमेरिकेसाठी काम करतात, असे राहुल गांधी म्हणाले.
भाजपने समाज विभागला
कांशीरामजी समाजात समानतेबद्दल बोलत होते. जर जवाहरलाल नेहरू जिवंत असते तर कांशीरामजी काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले असते. पण आज भाजपने समाजाला 15 आणि 85 टक्केमध्ये विभागले आहे. फायदा फक्त 15 टक्के लोकांना मिळत आहे. 50 टक्के लोकांना वेगळे केले आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
याचा अर्थ मोदींनी शरणागती पत्करली
मी संसदेत म्हटले की, मोदी सरकारने भारताच्या ऊर्जा सुरक्षेशी तडजोड केली, माईक बंद केला. एपस्टीन फाईलमध्ये मोदींचे नाव असल्याचा उल्लेख करताच माईक बंद झाला. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी आणि एपस्टीन यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. माईक बंद झाला. त्यांच्या मुलीच्या पंपनीत सोरोसने गुंतवलेल्या पैशांबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला. माईक बंद झाला याचा अर्थ मोदींनी शरणागती पत्करली आहे.


























































