
रेल कामगार सेना माटुंगा युनिटच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. रेल कामगार सेना ही नेहमी कामगारांच्या अन्यायाविरोधात लढणारी संघटना आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते, रेल कामगार सेनेचे अध्यक्ष विनायक राऊत यांनी यावेळी केले. तसेच सीआरएमएसबरोबर असलेल्या युतीचा पुनरोच्चार करून सीआरएमएस संघटनेस कामगार हिताचे कार्य करावे असे संबोधित केले.
रेल कामगार सेना माटुंगा युनिटच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला माटुंगा मुख्य कारखाना प्रबंधक विवेक आचार्यदेखील उपस्थित होते. रेल कामगार सेना जशी आक्रमक आहे तेवढीच शिस्तबद्ध आहे. माझ्याकडे ज्या समस्या पदाधिकारी आणतात त्या कामगारांचा हिताच्या असतात आणि अशा समस्या सोडविण्यास मला आनंद वाटतो, असे विवेक आचार्य म्हणाले.
यावेळी माजी महापौर स्नेहल आंबेकर, रेल कामगार सेनेचे सरचिटणीस दिवाकर (बाबी) देव, युनिट अध्यक्ष शशिकांत काळे, सचिव दिनेश खंडाळे, माजी सह कार्याध्यक्ष अर्जुन जामखिंडीकर, मुंबई डिव्हिजन अध्यक्ष चंद्रकांत विनरकर, सचिव तुकाराम कोरडे, सहकार्याध्यक्ष सूर्यकांत आंबेकर, भरत शर्मा, भुसावळ मंडल अध्यक्ष ललित मुथा, सरचिटणीस सोनाक्षी मोरे हे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परशुराम राणे, मंगेश जोशी, मिलिंद पाटील, वैभव अत्तरदे, सचिन मयेकर, सुधाकर देवकाते, सचिन गुरखे, संजय चिपकर, दिनेश भुरके, चिंता निखार्गे, शिल्पा म्हात्रे, अनघा तेंडुलकर, नीता ढोबळे, चंद्रकांत जळगांवकर, राजेश कोकाटे, अतुल पेडणेकर आणि नरेंद्र यादव यांनी परिश्रम घेतले.