
रेल्वेचे अनरिझर्व्हड् टिकेटिंग सिस्टम (यूटीएस) हे अॅप येत्या 1 मार्च 2026 पासून बंद केले जाणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना जनरल आणि प्लॅटफॉर्म तिकिटे बुक करण्यासाठी नवीन सुपर अॅप रेलवनवर अवलंबून राहावे लागणार आहे. रेल्वे प्रवाशांना एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी यूटीएस हे अॅप बंद करण्यात येणार आहे, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. प्रवाशांना यूटीएस अॅपवरून जनरल आणि प्लॅटफॉर्मची ऑनलाईन तिकीट खरेदी करण्याची सुविधा मिळत होती.


























































