
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळय़ा मातीतल्या आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष मराठी असावा. पाटील असावा, पण पटेल नसावा अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पुढील अध्यक्ष कोण होणार याबाबत चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे यांनी आपले स्पष्ट मत मांडले आहे. ‘महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे. त्यावर खरंतर भाष्य करावं असं वाटत नाही, पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यावर बोलावंच लागेल’, असे राज ठाकरे यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.
























































