
शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र सुरू असतानाच काशिमीरा येथे शिवसैनिक व मनसे कार्यकर्त्यांची एकजूट दिसून आली. निमित्त होते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नव्या शाखेच्या उद्घाटनाचे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी हस्तांदोलन करीत शुभेच्छा दिल्या. शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाखेच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडला.
मीरा रोड येथील काशिमीरा भागात शिवसेना शहरप्रमुख प्रशांत सावंत यांनी सुरू केलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार राजन विचारे आणि उपनेते विनोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी संपर्क संघटक रोशनी गायकवाड, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, जिल्हा संघटक नीलम ढवण, महाराष्ट्र राज्य संघटक विनय शुक्ला, विधानसभाप्रमुख मनोज मयेकर, ग्राहक संरक्षण कक्षाचे सदानंद घोसाळकर, उपजिल्हाप्रमुख धनेश पाटील, मोजेस चिन्नप्पा, सुभाष केसरकर, गजानन रकवी, उपजिल्हा संघटक प्राची पाटील, सुप्रिया घोसाळकर, क्षमा गांधी, हेमलता जोशी, कांचन लाड, स्नेहल सावंत, शहरप्रमुख दीपक नलावडे, शहर संघटक श्रेया साळवी, मनीषा भोपळे, उपशहरप्रमुख शेखर पाटील, उपशहर संघटक उषा उगाडे, विभागप्रमुख अनिल भोसले, जगदीश जोशी, अरुण मांढरे, अवधेश विश्वकर्मा, शाखाप्रमुख नरेंद्र उपरकर, गौतम म्हसे, रोहित सकपाळ, महेंद्र गुप्ता, कोकरे दादा, सुषमा नाईक, दीपेश गावंड, मंदार रकवी, जिल्हा सचिव श्रेयस हडकर, दर्पण गावकर, किरण मांजरेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप राणे, विधानसभा अध्यक्ष सचिन पोपळे, शहर सचिव प्रकाश शेलार, अमोल पाटील, रोशन कांबळे, शहर अध्यक्षा कविता वायंगणकर, रॉबर्ट डिसुझा आदी उपस्थित होते.